विधानसभा निवडणूक 2019 साठी एक खिडकी सुविधा केंद्र

99
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

सिंधुदुर्गनगरी :विधानसभा निवडणूक 2019 साठी राजकीय पक्ष, उमेदवार यांना विविध परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगांच्या लेखी तरतुदीनुसार व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 28 अ, 159 व 134 मधील तरतुदींचा वापर करुन तहसिलदार कार्यालय, कुडाळ येथे एक खिडकी सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या सुविधेमुळे विविध परवानग्यांसाठी राजकीय पक्ष, उमेदवार यांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. तर एकाच ठिकाणी परवानग्या मिळतील व वेळेचीही बचत होणार आहे.

राजकीय पक्ष व उमेदवार यांना या एकाच खिडकीवर मिळणाऱ्या विवध परवानग्या पुढील प्रमाणे आेहेत. चौक सभा, सर्व प्रकारच्या जाहिर सभा, पोस्टर्स, झेंडे, बॅनर इ सभेच्या ठिकाणी लावणे, खाजगी जागेवर जाहिरात फळक, प्रचार वाहन परवानगी, 269 – कुडाळ विधानसभा मतदार संघ कार्यकक्षेसाठी, प्रचार कार्यालय परवानगी, हेलीपॅडवर हेलिकॉप्टर उतरवणे, ध्वनीक्षेपकाची परवानगी, मिळवणूक व रोड शो, केबल जाहिरात परवानगी या सर्व परवानग्या एकाच खिडकीवर सकाळी 10.30 ते सायं. 4.00 या कालावधीत मिळणार असल्याचे 269 – कुडाळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांनी कळविले आहे.

\