सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासणाऱ्या अक्षयला तात्काळ अटक करा…

2

दिल्ली विद्यालयातील प्रकार; हिंदू जनजागृती समितीचे केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन…

सिंधुदुर्गनगरी ता.२०: दिल्ली विश्वविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणाऱ्या अक्षय लाकड़ा याला तात्काळ अटक करावी आणि राष्ट्रपुरुषांची विटंबना रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने केंद्रीय गृहमंत्र्याकड़े निवेदनद्वारे केली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिल्ली विश्वविद्यालयात स्वातंत्रवीर विनायक सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस अणि हुतात्मा भगतसिंग या त्रिमूर्तिंचे एकत्रित पुतळे बसविले होते. २१ ऑगस्ट रोजी रात्रि  कॉंग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स यूनियन ऑफ इंडिया (एनएसयुआय) या विद्यार्थी संघटनेचा दिल्ली अध्यक्ष अक्षय लाकडा याने आणि त्याच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासले असल्याचा आरोप हिंदु जनजागृती समितिने केला आहे.  देशासाठी आपले सम्पूर्ण आयुष्य अर्पण करणारे आणि दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या

राष्ट्रपुरुषांची अशी विटंबना करणारी कृती अतिशय संतापजनक आणि निषेधार्ह आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणाऱ्या अक्षय लाकड़ा याला तात्काळ अटक करण्यात यावी, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, राष्ट्रपुरुषांची विटंबना रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, अंदमान येथील त्यांच्या काढण्यात आलेल्या ओळी पुन्हा बसविन्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा, फ्रान्स सरकारशी चर्चा करून मार्सेलिस येथे त्यांचे भव्य स्मारक बांधावे, त्यांना भारतरत्न जाहिर करावे अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्र्यांकड़े केली आहे. यावेळी समितीचे जिल्हाध्यक्ष गजानन मुंज, जगन्नाथ केरकर, सुरेश दाभोळकर, अमृता परब, रमेश आंगणे आदि उपस्थित होते.

नवरात्रोत्सवातील अपप्रकार थांबवावे

भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी सार्वजनिक नवरात्रोयस्तवाला सुरुवात करण्यात आली. मात्र आता या नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार घडत आहेत. यात चित्रपटातील गितांवर गरबा खेळणे, मद्यपान करुण नाचने, अश्लील अंगविक्षेप करत नाचने, जबदरस्तीने वर्गणी गोळा करणे आदि प्रकार घडत आहेत. त्यामुळे या उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे आणि अनैतिककृत्ये वाढत आहेत. याकडे हिंदु जनजागृती समितीच्यावतीने आज जिल्हा पोलिस अधिक्षकांचे निवेदनद्वारे लक्ष वेधन्यात आले आणि नवरात्रोत्सवच्या आड होणाऱ्या अपप्रकार थांबवून आदर्श नवरात्रोत्सव साजरा करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

फोटो ओळ:- पहिल्या छायाचित्रात नायब तहसीलदार सुजाता पाटिल यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन सादर करताना तर दुसऱ्या छायाचित्रात पोलिस उपअधीक्षक संध्या गावडे यांच्याकड़े नवरात्रोत्सवचे निवेदन सादर करताना हिन्दू जनजागृती समितीचे पदाधिकारी

12

4