शिवसेनेकडून आडेलीतील विकास कामांची भूमिपूजने श्रेयवादासाठी

2

समिधा कुडाळकर : पाठपुरावा आम्ही केला

वेंगुर्ले : ता.२०
ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केलेल्या आणि जिल्हा नियोजन मधून मंजुरी मिळालेल्या तालुक्यातील आडेली गावातील विकास कामांची भूमीपूजने शिवसेनेने करून स्वतःला श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. असा आरोप आडेली सरपंच समिधा कुडाळकर यांनी केला आहे.
आडेली गावातील आडेली दाभाडीवाडी रस्ता ५ लाख, कांबळेवीर धुरिवाडी रस्ता ५ लाख, आडेली वजराठ पिपळाचे भरड ते वजराठ देऊळवाडी रस्ता ५ लाख, आडेली ते गावठणवाडी रास्ता ८ लाख. या कामांची जि. प. बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर आडेली पोस्ट ते सोमेश्वर मंदिर जाणारा रस्ता ५ लाख निधी हे जनसुविधा अंतर्गत काम असून त्याची निविदा प्रक्रिया झाली नसतानाही त्याचे भूमिपूजन केलेले आहे.
पालकमंत्री नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात म्हणून ते प्रस्तावित केलेल्या कामांना मंजुरी देतात. मात्र ती कामे त्यांनी आणली असा होत नाही. त्यामुळे गावात विकास कामात राजकारण आणणे योग्य नाही. शिवसेनेने जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते व तालुका प्रमुख यशवंत परब यांच्या उपस्थितीमध्ये ही भूमीपूजने केली. मात्र गावातील या विकास कामांच्या भूमीपूजनासाठी गावाची प्रथम नागरिक म्हणजेच सरपंच या नात्याने त्यांनी मला व जिल्हा नियोजन सदस्या समिधा नाईक यांनाही डावलून ही भूमिपूजन केली असून हा आधीकार शिवसेनेला कोणी दिला? एरवी सिंधुदुर्गची संस्कृती सांगणारे पालकमंत्री केसरकर आपल्या कार्यकर्त्यांना संस्कृती कधी शिकवणार असा सवाल सरपंच कुडाळकर यांनी उपस्थित केला आहे.

12

4