Monday, November 4, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआडाळीत मंजूर झालेले औषधी संशोधन केंद्र जळगाव मध्ये हलवले...

आडाळीत मंजूर झालेले औषधी संशोधन केंद्र जळगाव मध्ये हलवले…

श्रीपाद नाईक यांचा आरोप; आवश्यक वातावरण असल्यामुळे पुन्हा या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न…

सावंतवाडी ता.२१: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथे मंजूर करण्यात आलेले वन औषधी संशोधन केंद्र तत्कालीन आरोग्यमंत्त्री दीपक सावंत यांनी जळगाव येथे हलविले असा गौप्यस्फोट आज येथे केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी केला.मात्र त्यासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण त्या ठिकाणी उपलब्धा नाही,त्यामुळे पुन्हा एकदा ते केंद्र सिंधुदुर्गात आणण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.श्री नाईक हे आज या ठिकाणी ३७० कलमा बाबत माहिती देण्यासाठी आले होते.यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सावंतवाडीतील बंद करण्यात आलेली आर्मी कॅन्टीन तात्काळ सुरू करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दीले.तसेच भविष्यात जिल्ह्यात सहा वेलनेस हेल्थ सेंटर सुरू करण्यात येणार आहेत,असे ही ते म्हणाले यावेळी माजी आमदार राजन तेली महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप भारमल,मनोज नाईक,निशांत तोरसकर,आनंद नेवगी,श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप भरमल,डॉ.यु.एल देठे,डॉ.मोहन चौगुले,उमेश पवार, सुगंधा सावंत,प्रगती अमृते,डॉ सुगंधा देसाई,डॉ यु.सी.पाटील,डॉ. प्राध्यापक श्री.गोडकर ,गणपत शिरोडकर,संजय,महापुरे,बी.एच हिरामणी,एम.बी.बर्गे,शांताराम वैरागे,डी.एन.पाटील,सचिन कांबळे,हर्षद राव,योगेश चौधरी संदीप पाटील कविता तळेकर तसेच इतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments