आजपासून आचारसंहिता लागू :२४ ऑक्टोबरला होणार मतमोजणी
मुंबई ता.२१: राज्यातील विधानसभा निवडणूक २१ ऑक्टोबरला होणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणीची प्रक्रिया होणार असल्याची घोषणा,आज आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
हरियाणा व महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.राज्यात २ कोटी ९४ लाख मतदार असून,इव्हीएम मशिनच्या माध्यमातून ही निवडणूक घेण्यात येणार आहे.आजपासून राज्यभरात आचारसंहिता लागू करण्यात आली.या प्रकीयेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २७ सप्टेंबर ते चार ऑक्टोंबर पर्यंत आहे.छाननी प्रक्रिया ५ ऑक्टोबरला होणार आहे. मतदान २१ ऑक्टोबरला होईल,असे यावेळी आयोगाकडुन स्पष्ट करण्यात आलेले आहे.