मास्टर इन स्पोर्टस फिजिओथेरपी मध्ये साध्वी कोयंडे प्रथम

2

वेंगुर्ले : ता.२१: बेळगांव-कर्नाटक येथे उच्च शिक्षणासाठी असलेल्या कु. साध्वी सुमंत कोयंडे हिने के.एल.ई इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरपी मधून मास्टर इन स्पोर्टस फिजिओथेरपीमध्ये प्रथम श्रेणीत पदवी संपादन केली आहे.
सुरुवातीपासूनच खेळाची आवड असल्याने तिने या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले आहे. एशियन गेम्स, एशियन रोल बॉल स्पर्धा यांसह क्रिकेट, स्केटींग, फुटबॉल, बॅडमींटन या स्पर्धेतील खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्याचे तिचे काम तिने चोखपणे बजावले आहे. शिमला येथे पार पडलेल्या २०१९ च्या इंटरनॅशनल स्पोर्टस् कॉन्फरन्सच्यावेळी तिला पेपर प्रेझेंटेशनमध्ये पारितोषिक मिळाले होते. नवनविन खेळ व खेळातील नविन तंत्रज्ञान, विना ऑपरेशन शरीराची तंदुरुस्ती व त्यावरील नविन पद्धतीचे उपचार याचा तिला चांगला अभ्यास आहे. त्यावर तिने लेखन केलेले रिसर्च पेपर देशातील व विदेशातील जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. खेळा व्यतिरिक्त तिला संगित व नृत्य या क्षेत्रामध्येही आवड आहे. खेळामुळे मानसिक स्वास्थ्य व शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते असे ती सांगते.
डॉ. साध्वी ही मूळचे वेंगुर्ला-गिरपवाडा व नोकरीनिमित्त पणजी-गोवा येथे वास्तव्यास असलेल्या सुमंत कोयंडे यांची कन्या होय.

13

4