आंबोली कबुलायत गावकर प्रश्न अखेर सुटला…

2

राजन तेलींची माहिती:आवश्यक अध्यादेश काढल्याची खुद्द चंद्रकांत पाटलांची माहीती…

सावंतवाडी.ता,२१:
आंबोली येथील गावकर प्रश्न अखेर सुटला आहे.याबाबतचा पोषक अध्यादेश काढण्यात आला आहे.अशी माहीती खुद्द सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून दिल्याची माहीती माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी आज येथे दिली.
दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोन दिवसापूर्वी हा प्रश्न सुटल्यात जमा आहे असे विधान केले होते. त्याला राजन तेली व आंबोली भागातील लोकांनी विरोध केला होता. तसेच केसरकर हे नुसती आश्वासने देऊन धूळफेक करीत आहेत असा आरोप केला होता. त्यामुळे या प्रश्नावरून श्रेयवाद रंगला होता.मात्र आज अखेर बांधकाम मंत्री पाटील यांनी याबाबतचा अध्यादेश दिला आहे.असे तेली यांनी सांगितले.

16

4