मालवण, ता. २५ : शहरातील मेढा राजकोट येथील स्थानिक रहिवाशांसाठी धोकादायक ठरलेला विद्युत खांब हटविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
मेढा राजकोट येथील रहिवासी पप्पु लुईस तसेच अन्य स्थानिक रहिवाशांना विद्युत खांब धोकादायक बनला होता. हा विद्युत खांब हटविण्यात यावा अशी स्थानिक रहिवाशांची बऱ्याच वर्षाची मागणी होती. त्यानुसार पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने हा धोकादायक विद्युत खांब हटविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. हे काम अखेर मार्गी लागल्याने पप्पू लुईस यांच्यासह अन्य स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. याबाबत श्री. जावकर यांनी आमदार नाईक तसेच महावितरणचे आभार मानले आहेत.