दाभोली येथील महाराष्ट्र स्वाभिमानचे कार्यकर्ते भाजपात…

2

वेंगुर्ले.ता,२१: येथील महाराष्ट्र स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपात प्रवेश केला. माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला. यात ग्रामपंचायतीचे सदस्य विष्णू दाभोळकर यांच्यासह स्वाभिमानचे बुथ अध्यक्ष प्रवीण दाभोळकर आदींचा समावेश आहे.
यात सिद्धार्थ दाभोलकर, श्रीकांत दाभोलकर, साबाजी दाभोलकर, संजय दाभोलकर, अरुण दाभोलकर, गौरव दाभोलकर, अमित दाभोलकर, रविद्र दाभोलकर, वैभवी दाभोलकर, किशोरी दाभोलकर यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत व दाभोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी जिल्हा चिटणीस साईप्रसाद नाईक, माजी जिल्हापरिषद सदस्य बाबा राऊत, विस्तारक पंकज बुटाला,  भाजप बुथ अध्यक्ष देवेंद्र राऊळ, युवा मोर्चाचे राजाराम कांबळी आदी उपस्थित होते.

2

4