वैभववाडी-कुर्ली येथे वृद्ध दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला…

2

दोघे जखमी;रुग्णालयात अधिक उपचार सुरू…

वैभववाडी/पंकज मोरे २१: घरगुती कुत्र्याला वाचविण्याच्या नादात वृद्ध दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार वैभववाडी-कुर्ली येथे घडला आहे.यात दोघेजण जखमी झाले आहेत.ही घटना काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
या हल्ल्यानंतर बिबट्याने जंगलाकडे पलायन केले,त्यामुळे मोठा अनर्थ टळला.यातील गंभीर जखमी असलेल्या मोहन पवार यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

14

4