स्वाभिमान तालुकाध्यक्ष मंदार केणी, यतीन खोत यांनी बांधले शिवबंधन…

2

राष्ट्रवादीच्या गिरकर, कासवकर यांचाही शिवसेनेत प्रवेश ; स्वाभिमानला मोठे खिंडार…

मालवण, ता. २१ : स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, युवा नगरसेवक यतीन खोत यांच्यासह शीला गिरकर, दर्शना कासवकर या चार नगरसेवकांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री. ठाकरे यांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधण्यात आले. या प्रवेशामुळे आमदार वैभव नाईक यांनी स्वाभिमानला तालुक्यात मोठे खिंडार पाडले आहे.
या पक्ष प्रवेशास खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बबन शिंदे, शिल्पा खोत यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षांतर्गत असलेल्या वादामुळे तसेच शहरातील प्रलंबित विकासकामे ही शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लागू शकतात असा विश्वास असल्यानेच आम्ही आज शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे मंदार केणी, यतीन खोत, शीला गिरकर, दर्शना कासवकर यांनी प्रवेशानंतर स्पष्ट केले.
आमदार वैभव नाईक यांनी हा प्रवेश घेत स्वाभिमानला मोठा धक्का दिला आहे. या चार नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ आता १० झाले आहे.

28

4