सावंतवाडीत उद्या युवा सिंधू फाउंडेशनची स्वच्छता मोहीम…

2

सावंतवाडी ता.२१: येथील युवा सिंधू फाउंडेशन,सिंधुदुर्ग व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.सकाळी ७:०० वाजता गांधी चौक परिसरातून या मोहिमेला सुरुवात होणार आहे.यावेळी मोठ्या संख्येने येथील नागरिकांनी उपस्थित राहून या मोहिमेला सहकार्य करावे,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सागर नाणोसकर यांनी केले आहे.

सावंतवाडी शहरात पर्यटकांची,तसेच इतर नागरिकांची ये-जा वाढत आहे,त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य होत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी नेहमीच आपले प्रामाणिक योगदान देत आहेत.त्यांच्या या कामात खारीचा वाटा उचलण्याचा ही मोहीम राबवण्याचा संकल्प सिंधू फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.अधिक माहितीसाठी
सोमेश्वर सावंत 919765812935 व सागर नाणोसकर 91 9423309166 या नंबर वर संपर्क साधावा.

0

4