माजी तालुकाप्रमुख बाळा दळवी व माजी नगराध्यक्ष सुनील दुबळे यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड

105
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला तालुका शिवसेना कार्यकारणी मध्ये फेरबदल

वेंगुर्ले.ता.२१:वेंगुर्ला तालुका शिवसेना कार्यकारणी मध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने फेरबदल करण्यात आले आहेत. वेंगुर्लेचे माजी तालुकाप्रमुख बाळा दळवी व माजी नगराध्यक्ष सुनील दुबळे यांची उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेना भवन येथून देण्यात आलेल्या नावांची नियुक्तीपत्रे आज सकाळी १० वाजता तालुका प्रमुख यशवंत परब यांच्या वतीने वेंगुर्ले शाखेत पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून देण्यात आली. श्री. दळवी व श्री. डुबळे यांच्या बरोबर वेंगुर्ला शहर समन्वयक पदी विवेक आरोलकर तर शहर प्रमुख पदी अजित राऊळ यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान उपजिल्हा प्रमुख सुनील डुबळे यांच्यावर वेंगुर्ला शहर तसेच उभादांडा मतदार संघाची जबाबदारी तर बाळा दळवी यांच्यावर तुळस व रेडी मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. या स्वागत कार्यक्रमावेळी वेंगुर्ला तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

\