कलमठ-बिडयेवाडी येथे दोन घरे चोरट्यांनी फोडली

2

कणकवली, ता.२१: कणकवली शहरालगतच्या कलमठ बिडयेवाडी मध्ये चोरट्यांनी दोन घरे फोडली. यात बिडयेवाडी येथील राजाराम बाळाजी देसाई आणि त्याच्या समोरील सावंत यांचा साईलिला बंगला या दोन घरात घरफोडी झाली आहे. मात्र या दोन्ही घटनांत अद्यापही कोणाचा किती मुद्देमाल गेला याची माहिती उपलब्ध झाली नाही. पोलिस घटनास्थळी येऊन तपास करीत आहेत. चोरट्याने घरांचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तसेच कपाटे आणि लॉकर फोडून आतील ऐवज लंपास केल्याची शक्यता आहे. या बंद घराचे मालक आल्यानंतर किती किंमतीचा ऐवज चोरीस गेला हे समजू शकणार आहे.

1

4