वेंगुर्ले : ता.२१
विध्यमान खासदार नारायण राणे यांच्या स्थानिक विकास निधीतून वेंगुर्ले तालुक्यातील राणेवाडी ते धनगरवाडी रस्त्याच्या कामासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन जि. प. समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गावातील अन्य विकास कामांची भूमीपूजनेही करण्यात आली.
वजराट गावातील या विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला स्वाभिमान पक्षाचे माजी वेंगुर्ले तालुका अध्यक्ष मनीष दळवी, नितीन चव्हाण, सरपंच महेश राणे, उपसरपंच नितीन परब, चेअरमन ताता परब, गाव प्रमुख सूर्यकांत परब तसेच आबा परब, दिगंबर पेडणेकर, प्रेमानंद भोसले, वामन भोसले, सुधाकर भोसले, हरिशचंद्र जाधव, एस.एस.जाधव, वसंत परब, प्रमिला राणे, शारदा राणे, दीपिका राणे, ग्रा. प.कर्मचारी रवी मोरे,प्रदीप गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी जि. प.समाजकल्याण शेष निधीतून मंजूर झालेल्या मागासवर्गीय वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे १ लाख ७० हजारांचे काम तसेच जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेले ग्रामपंचायत इमारती समोर पिलर ब्लॉग बसविणे या कामाचे भूमीपूजनही या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.