युवा नेते निशांत तोरसकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

2

सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती:रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी.ता,२१:
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे युवा मोर्चाचे सरचिटणीस निशांत तोरसकर यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी आमदार राजन तेली, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, अमित परब, प्रथमेश तेली,चिंतामणी तोरसकर, बाळा कुडतरकर, प्रशांत जोशी, सुरज कार्वेकर, पिंट्या देसाई बबन पिंटो,अमोल शितोळे,पप्पू माठेकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री तोरसकर यांना उपस्थितांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.त्यांचे सामाजिक कार्य व अन्य विविध उपक्रमांत असणारी धडपड लक्षात घेता त्यांना भविष्यात निश्चीतच यश मिळो अशा त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

4

4