ओसरगाव मधील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

2

कणकवली, ता.२२: ओसरगाव मधील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भगवा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली विजय भवन येथे झालेल्या प्रवेश कार्यक्रमात आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांच्या हातात भगवा झेंडा देत शिवसेनेत स्वागत केले.

ओसरगाव मधील स्वाभिमानाचे कट्टर कार्यकर्ते दिनेश अपराज,नितीन धुरी,विनोद मोरे,रुपेश मोरे,महेश वारंग,सूरज कदम,स्वप्नील राणे,अक्षय राणे,चेतन राणे,रोशन राणे,अक्षय मोरे,शार्दूल वारंग,आदित्य मोरे,दीपिकेश राणे,उदय शिर्के,निलेश परब,गणेश मोरे,सुशांत मोहिते,राजेंद्र शेट्ये,अमित तोरस्कर,अमित अपराज,संतोष परब,सूरज परब,गजानन परब,सूरज जाधव,सुबोध तळेकर,सकेंत शिंदे,रोहन जाधव,दीपेश चव्हाण,प्रमोद मोरे,साक्षी परब,संजय परब आदी 50 हुन अधिक कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला.
आमदार नाईक म्हणाले,.स्वाभिमान पक्षातील नेत्यांची भूमिका हि स्वार्थी असल्याने काही प्रामाणिक कार्यकर्ते सेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेनेत मेगाभरती सुरु असून पक्षात येणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याचा मानसन्मान राखला जाईल. यापुढे हि अनेक कार्यकर्ते सेनेत प्रवेश करतील असे त्यांनी सांगितले.
स्वाभिमान पक्षातील नेत्यांची विश्वासाहर्ता राहिली नसून ओसरगाव मधील विविध विकासकामे अद्याप हि जैसे थे आहेत.पालकमंत्री दीपक केसरकर,खास.विनायक राऊत, आम.वैभव नाईक,संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्यावर विश्वास ठेवून ओसरगावच्या विकासासाठी सर्व कार्यकर्ते सनेत प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्याकडून सांगण्यात आले.
या प्रवेशावेळी महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,तालुकाप्रमुख शैलेश भोगले,उपतालुका प्रमुख राजू राणे,प्रतीक्षा साटम,अँड.हर्षद गावडे,गीतेश कडू,विभाग प्रमुख रुपेश आमडोस्कर,ललित घाडीगावकर,ओसरगाव सरपंच प्रमोद कावले,उमेश घाडीगावकर,उपसरपंच मुरलीधर परब,प्रभाकर सावंत,दीपक मूळये,दशरथ शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो – भगवा झेंडा हातात देऊन प्रवेश कर्त्याचे अभिनंदन करताना आम.वैभव नाईक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आदी (छाया -अनिकेत उचले )

4

4