योग्दा राऊळ आणि जुई उबाळे यांची बुद्धिबळ स्पर्धेसाठी विभाग स्तरावर निवड

2

रत्नागिरी येथे उद्यापासुन होणार विभागीय स्पर्धा

कणकवली, ता. २२ : शालेय क्रीडा स्पर्धेच्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर विभागात योग्दा संतोष राऊळ अािण जुई राजेंद्र उबाळे यांची विभाग स्तरावर १९ वर्ष वयोगटात निवड झाली आहे. रत्नागिरी रा.भा. शिर्के हायस्कुल येथे ही बुद्धीबळ स्पर्धा सोमवार २३ व २४ सप्टेंबर रोजी होणार आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
जुई उबाळे ही चाटे एज्युकेशन सोसायटी च्या पणदुर कॉलेज येथे इ.१२वी त आहे तर योग्दा राऊळ ही कणकवली कॉलेज येथे इ.११ वीत आहे. तालुका आणि जिल्हास्तरावर यश मिळविल्यानंतर त्यांची विभाग स्तरावर ही निवड झालेली आहे. कणकवली कॉलेज मधुन १४ आणि १७ वयोगटात ओंकार तावडे, वेदांत गावकर यांची निवड झाली आहे. २०१९-२० च्या शालेय क्रीडा स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थापदाधिकारी, शिक्षक यांचेकडूनही अभिनंदन केले जात आहे.

1

4