चराठे सरपंच उपसरपंचाचा शिवसेनेत प्रवेश…

2

केसरकरांनी बांधले शिवबंधन:तेराशे लोकांना रोजगार देणारा प्रकल्प उभा करणार…

सावंतवाडी.ता,२२:
चराटे गावचे सरपंच बाळू वाळके यांच्यासह उपसरपंच जाॅनी फेराव व अन्य चार सदस्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.या ग्रामपंचाय तींवर त्यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने दावा केला होता.
पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत त्यांना शिवबंधन बांधण्यात आले.गावच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेतला आहे असे करण्याची सरपंच श्री वाळके यांनी सांगितले.
यावेळी संस्थानकालापासुन सावंतवाडी तालुक्याची मुख्यवाडी असलेल्या चराटे गावच्या विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्न केला आहे. भविष्यात त्या ठिकाणी तब्येत तेराशे लोकांना नोकरी देणारा प्रकल्प आणून परिसराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करेन असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
यावेळी मोहन परब,संदीप मेस्त्री,अॅना डिसोझा,तन्वी परब आदी उपस्थित होते.

20

4