अधिकाऱ्यांवर चिखल ओतणा-या प्रवृत्तीला हद्दपार करा…

2

दीपक केसरकर: ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आंबोली कबुलायतदार प्रश्न सुटला…

सावंतवाडी.ता,२२:
गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील राडेबाजीची संस्कृती मी संपवली. आता अधिका-यावर चिखल ओतणारे लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून येणार नाहीत.यासाठी तुम्ही दक्षता घ्या .आंबोली कबुलायतदारगावकर प्रश्न केवळ त्रिस्तरीय समिती नेमल्या मुळे सुटू शकला आपण त्याचे क्रेडिट घेणार नाही. परंतु अन्य कोणी तसा प्रयत्न करू नये.
ज्यावेळी तेथील वनजमिनीचीचा प्रश्न मार्गी लागून तेथील लोकांना जमिनी मिळतील, त्याच वेळी हा प्रश्न सुटला असे मी म्हणेन अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.
श्री.केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले दोडामार्ग येथील पाच गावांचा पाण्याचा प्रश्न चांदा ते बांदा योजनेतून १२ कोटी रुपये देऊन आपण सोडवला मात्र त्याचे श्रेय घेण्यासाठी राजन तेली यांनी सगळीकडे बॅनर लावले. याच पद्धतीने आंबोली गेळे कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न आपणच सोडवण्याचे तेली सांगत आहेत. मात्र हा प्रश्न जर कोणी सोडवला असेल तर त्याचे श्रेय आहे. निव्वळ तेथील ग्रामस्थांच्या एकजुटीला आहे.
केसरकर पुढे म्हणाले खबरदार गावकर जमीन प्रश्न कसा सोडवायचा हे मला माहीत होते. त्यामुळेच आपण सुरुवातीला त्रीसदस्यीय समिती नेमली होती. मात्र ही समिती नेमली यावरही या लोकांनी माझ्यावर टीका केली होती. मात्र या समितीचा अहवाल आज शासनाने मान्य केला ही वस्तुस्थिती आहे. आपण तेवढाच राजकारण आयुष्यात कधीच केलं नाही सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे हे माझं काम असून हा प्रश्न सोडवण्यामध्ये बंदर विकासराज्य मंत्री रवींद्र चव्हाण भाजप प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांचा शंभर टक्के सहभाग आहे त्याचे आपण स्वागतच करतो. मात्र राजन तेली हे याचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न करत असतील तर अध्यादेशावर सही करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी झालेलं माझं बोलणं माझ्या फोन रेकॉर्ड मध्ये अजूनही आहे.
आमदार नितेश राणे यांच्यावरही केसरकर यांनी नाव न घेता टीका केली ते म्हणाले चिखल ओतणारे लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून आल्यास याठिकाणी डॉक्टर तसेच शासकीय कर्मचारी येण्यास धजावतील त्यामुळे उर्वरित असलेली दहा टक्के लढाई आपल्याला लढायची असून याचे बळ आम्हाला सिँधुदुर्गातील जनताच देईल. जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे पाच वर्षात याठिकाणी शांतता नांदली या शांततेने येथील ऱाडा संस्कृती हद्दपार झाली त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली येणाऱ्या निवडणुकीतही जनता आमच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले आंबोली हे माझं दुसरं घर आहे त्यामुळे आंबोली बरोबरच नजीकच्या गावांचा कायापालट करण्यासाठी आपला प्रयत्न आहे त्यासाठी कोट्यावधीचा निधी आपण उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये आंबोली मुख्याध्यापक याबरोबरच इतर १० धबधबे विकसित करण्यासाठी तसेच बॅटरी ऑपरेटर कार उपलब्ध करून देण्यासाठी आपण निधी दिला आहे.

9

4