डोक्यात घातला दगड,महीला जखमी: अधिक उपचारासाठी रुग्णालयात हलविले….
दोडामार्ग/सुमित दळवी.ता,२२: चोरीच्या उद्देशाने डोक्यात दगड घालून वृद्ध महिलेला लुटल्याचा प्रकार आंबेली येथे घडला आहे.यात संबंधित महिला जखमी झाली आहे. सुभद्रा गोपाळ गवस वय ७५ असे तिचे नाव आहे. तिला अधिक उपचारासाठी दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्र हलविण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी नूतनवाडी येथे राहणाऱ्या गवस या बाजार खरेदी करण्यासाठी जात होत्या.
यावेळी तेथून ऍक्टिवा दुचाकीने आलेल्या अज्ञात चोरट्यांनी तिच्या डोक्यावर दगड मारून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व माळा घेवून पलायन केले. तेथे जमलेल्या ग्रामस्थांच्या मध्ये गवस यांना रुग्णालयात हलवण्यात आले घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. अज्ञात चोरटे नेमके कोण याचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थ पोलिस प्रयत्न करत आहेत.