Thursday, December 12, 2024
Google search engine
Homeकोंकण पर्यटनबांदा पूरग्रस्तांना तफावत नको,समान नुकसान भरपाई द्या...

बांदा पूरग्रस्तांना तफावत नको,समान नुकसान भरपाई द्या…

संजू परब, जावेद खतीबांची मागणी; तहसीलदार श्रीधर पाटील यांना विचारला जाब…

सावंतवाडी,ता.३०: बांदा शहरातील पुरग्रस्तांना देण्यात आलेल्या नुकसान भरपाई रकमेत असलेली तफावत दूर करून समान नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब व बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे आज येथे केली.
बांदा येथील पूरग्रस्तांची २०१९ ची नुकसान भरपाई कित्येक वर्ष महसूलच्या गलथान कारभारामुळे अडकून पडली होती. अनेक वर्षे मागणी करून ही नुकसान भरपाई मिळत नव्हती. दरम्यान श्री.परब व श्री. खतीब यांनी याबाबत खासदार नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर २१० जणांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात आली. दरम्यान रक्कम वर्ग करताना काही जणांच्या रकमेमध्ये तफावत दिसून आली आहे. तपावर दूर करून सर्वांना समान रक्कम द्या, अशी मागणी आज त्यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयामध्ये धडक देऊन तहसीलदार श्रीधर पाटील यांना जाब विचारला. कित्येक वर्ष मागणी करून मिळालेली रक्कम परिपूर्ण द्या अर्धवट रक्कम देऊन आमच्या जखमेवर मीठ चोळू नका, अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments