वेतोरेतील प्रगतशील शेतकरी शिवराम गोगटे यांना कृषिभूषण पुरस्कार

124
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले .ता.२२:तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथील प्रगतशील शेतकरी शिवराम गोविंद गोगटे यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०१७ जाहीर करण्यात आला आहे. लवकरच एका खास कार्यक्रमात या पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.

कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग महाराष्ट्र शासनाकडून राज्यात कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती /संस्था यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषी भूषण,(सेंद्रिय शेती) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ, वसंतराव नाईक,वसंतराव नाईक उद्यान पंडित, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार दिला जातो. तसेच राज्यस्तरीय पीक स्पर्धा घेण्यात येऊन उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.
सिंधुदुर्ग जिल्हा वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे पालकरवाडी येथील प्रगतशील शेतकरी शिवराम गोविंद गोगटे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०१७ जाहीर झाला आहे. त्यामुळे गोगटे यांचे वेंगुर्लेसह जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

\