दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बांद्यात एकाला अटक

90
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

बांदा;
डंपर अपघातात काल जागीच ठार झालेल्या सुमितकुमार धर्मेंद्रकुमार सिंग (वय २६) याचा मृतदेह आज दुपारी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बांदा पोलिसांनी बेदरकारपणे डंपर चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक टी. बसवराज (रा. हॉस्पेट, कर्नाटक) याला ताब्यात घेऊन आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
झाराप-पत्रादेवी बायपासवर खालसा ढाबा येथे काल मध्यरात्री डंपर व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला होता. यामध्ये दुचाकीच्या मागे बसलेला सुमितकुमार हा डंपरवर आदळून रस्त्यावर आदळल्याने जागीच ठार झाला होता. तर दुचाकी चालक बिपीनकुमार सिंग हा गंभीर जखमी असून त्याचेवर गोवा-बांबोळी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
आज दुपारी मयत सुमितकुमार याचे भावोजी, चुलत भाऊ, वडील हे बांदा येथे आलेत. नातेवाईकांनी आपली कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितल्याने दुपारी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी विच्छेदन केले. दुपार नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
डंपर चालक बसवराज याला आज सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी सांगितले.

\