भोगवे समुद्र किनाऱ्यावर राबविली किनारा स्वच्छता मोहीम

2

 

वेंगुर्ले : ता.२२: तालुक्यातील ग्रामपंचायत भोगवे आणि अजय सारंग मित्रमंडळ परुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी भोगवे समुद्र किनाऱ्यावर किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत भोगवे सरपंच रुपेश मुंडये, ग्रामसेवक मंगेश नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी व अजय सारंग मित्र मंडळ चे कार्यकर्ते तसेच हॉटेल कोको शामबाला चे कर्मचारी व भोगवे ग्रामस्थ, बचत गट महिला तसेच परुळे बाजार येथील युवक उपस्थित होते.
पावसाळ्या मध्ये मोठ्या प्रमाणात कचरा किनाऱ्यावर जमा झाल्याने स्वच्छ सुंदर भोगवे सागर किनारा भकास दिसत आहे. याची दखल घेत या युवक मंडळ, ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांनी ही मोहीम राबवली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने आणखी काही दिवस स्वच्छता मोहीम राबवावी लागेल तरी स्वच्छता मोहीमेस स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे यांनी श्रमदानाच्या माध्यमातून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

57

4