सासू, सासरे, चुलत सासऱ्यास न्यायालयीन कोठडी…

2

 

कुणकवळे काव्या देसाई खून प्रकरण…

मालवण, ता. २२ : कुणकवळे येथील काव्या देसाई या विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सासू, सासरे, चुलत सासरे या तिघांना येथील पोलिसांनी अटक केली. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली आहे.
कुणकवळे येथील सौ. काव्या गोपाळ देसाई या विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पती गोपाळ सुरेश देसाई, सासरा सुरेश गोपाळ देसाई, सासू सुचिता सुरेश देसाई, चुलत सासरा अनिल गोपाळ देसाई या चौघाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यात पती गोपाळ देसाई याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. सासू, सासरे, चुलत सासरे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या तिघांचाही अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे काल या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत.

10

4