महेश सारंग:अल्पसंख्यांक निधीसाठी सावंतवाडीला एक कोटी
सावंतवाडी ता.२३: आम्हाला “ईश्वरी संकेत” मिळाले आहेत.साई बाबांच्या कृपेने सावंतवाडी मतदारसंघात नक्कीच भाजपाचा उमेदवार निवडून येईल,आगे-आगे देखो होता है क्या…असे सांगुन विधानसभा लढवणार याबाबत पक्षाने आदेश दिले आहेत.त्यामुळे त्या पद्धतीने तयारी सुरू आहे.असा दावा भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी आज येथे केला.
सावंतवाडी तालुक्यात अल्पसंख्यांक निधीतून तब्बल १ कोटी रुपयांची विविध कामे घेण्यात आली.याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी
यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अब्दुल साठी,सरचिटणीस महेश धुरी ,प्रसाद अरविंदेकर,मिनिन फर्नांडिस,मंदार कल्याणकर आदीं उपस्थित होते.