…..अखेर जिल्हाधिकारी पांढरपट्टेंनीच केली कार्यालयाची स्वच्छता…

2

१ सप्टेंबरपासून स्वच्छ्ता बंद असल्याने पसरलीय दुर्गंधी

सिंधुदुर्गनगरी.ता,२३:
जिल्हाधिकारी कार्यलयातील स्वच्छ्ता करण्यास 1 सप्टेंबरपासून बंद केल्याने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत डॉ पांढरपट्टे यांनी स्वतःच आपल्या कार्यालयाच स्वच्छ्ता करण्यास सुरुवात केली. परिणामी अन्य विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनाही यात सहभाग घेत आप-आपल्या कार्यालयाची स्वच्छ्ता करणे भाग पडले.
काही विभागांनी स्वच्छ्ता करणाऱ्या ठेकेदाराला त्यासाठी ठरलेली रक्कम दिली नाही. त्यामुळे 1 सप्टेंबर पासून ठेकेदाराने स्वच्छ्ता करण्यास बंद केले. परिणामी गेल्या 23 दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छ्तागृहे परिसरात दुर्गंधीचे तर कार्यालयाजवळ कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी पैसे न भरलेल्या विभागांना थकलेले पैसे तात्काळ भरणा करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. तरीही पैसे भरण्यात न आल्याने अस्वच्छतेने सर्व व्यापत चालले होते. कार्यालयात बसने तसेच स्वच्छ्ता गृहात जाणे किंवा त्याच्या बाजूने जाने सुद्धा कठीण बनले आहे.
त्यामुळे सोमवारी दुपारी राज्य कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी डॉ पांढरपट्टे यांची त्यांच्या दालनाबाहेर भेट घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी संघटनेचे एस एल सकपाळ आदी उपस्थित होते. यावेळी ज्या विभागांनी पैसे जमा केलेत ते ठेकेदाराला तात्काळ देण्याचे आदेश डॉ पांढरपट्टे यांनी दिले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छ्ता करण्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये नियोजन करण्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे ज्या विभागांचे पैसे येणे शिल्लक आहेत. ते आल्यावर ठेकेदाराला दया, असाही आदेश त्यांनी दिला. यावेळी आजच्या दिवसाची स्वच्छ्ता प्रत्येक विभागाने स्वतः करावी, असा निर्णय घेवून त्याची सुरुवात डॉ पांढरपट्टे यांनी आपल्या दालनानजीकचा सुका कचरा उचलून केली.

3

4