भुईबावडा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

2

वैभववाडी/पंकज मोरे.ता,२३: ज्ञानाचा दिवा घराघरात प्रज्वलीत करणाऱ्या आणि स्वातंत्र्य चळवळीस आधारवड ठरलेल्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३२ वी जयंती आदर्श विद्या मंदिर भुईबावडा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सुरुवातीला कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर येथील चौकात विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. यामध्ये झांज पथक, दिंडी पथक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. त्यानंतर भुईबावडा हायस्कूल ते बाजारपेठ अशी रॅली काढण्यात आली. यावेळी स्कूल कमिटी सदस्य मोतिराम मोरे, भालचंद्र साठे, रमाकांत मोरे, दशरथ प्रभू, मुख्याद्यापक एस. एम. घरपणकर, ए. एम. माने, बी. जे. माने, आर. व्हि. लाकडे, श्री. शेंडगे, श्री. कांबळे, श्री. वारे आदी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

7

4