वैभववाडी पोलिस ठाण्यातील २१ दिवसांच्या गणपतींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

2

डिजेच्या तालावर पोलिस दादाही थिरकले

वैभववाडी/पंकज मोरे.

वैभववाडी पोलिस ठाण्यातील २१ दिवसाच्या गणपतींचे विसर्जन रविवारी रात्री मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात शांततेत पार पडले. यावेळी डिजेच्या तालावर पोलिस दादाही थिरकले.
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या !अशा घोषणा देत ढोल ताशाच्या गजरात, फटाक्याची अतिशबाजी, गुलालाची उधळण करीत वैभववाडी पोलिसांनी आपल्या लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालत भक्तीभावाने निरोप दिला.

10

4