वेंगुर्लेत १ ऑक्टोंबर रोजी भव्य खुली संगीत भजन स्पर्धा

85
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

  1. सार्वजनिक नवरात्रोत्सव : मातोश्री कला क्रीडा मंडळातर्फे आयोजन

वेंगुर्ले : ता.२३
वेंगुर्ले-दाभोलीनाका येथे सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मातोश्री कला क्रीडा मंडळातर्फे १ ऑक्टोंबर रोजी भव्य खुल्या संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघास ७००० रुपये व प्रमाणपत्र, उपविजेत्या संघास ५००० रुपये व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांक विजेत्या संघास ३००० रुपये व प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण कार्यक्रमात त्यांना सन्मानित केले जाणार आहे.
दाभोलीनाका येथे मातोश्री कला क्रीडा मंडळाच्या सार्वजनिक नवरात्रोत्सव समितीची सभा अध्यक्ष दादा कुबल यांच्या उवस्थितीत पार पडली. यावेळी झलेल्या चर्चेअंती नवरात्रोत्सव समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक विलास गावडे यांची तर उपाध्यक्षपदी बाळू प्रभू यांची निकड करण्यात आली आहे. यावेळी विविध कार्यक्रमाचे नियोजन करून नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्याचे ठरविण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये संगीत भजन स्पर्धा १ तारीखला दुपारी ३ ते रात्रौ १० या वेळेत घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या एकूण १० संघांना सहभाग दिला जाणार आहे. प्रत्येक संघाला ४५ मिनिटे कालावधी असणार आहे. प्रत्येक संघाने स्वतःचे साहित्य स्वतः आणायचे असून भजनामध्ये किमान १० व जास्तीतजास्त १६ सदस्यांना सहभाग घेता येणार आहे. तसेच प्रत्येकाने पहिला गजर हा श्री. दुर्गादेवीचाच म्हणायचा आहे. तरी जास्तीत जास्त संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, अधिक माहिती साठी सुनील मांजरेकर मो.९४२१२६८१९९ किंवा तुषार साळगावकर मो.९४०४५१२३८४ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नवरात्रोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

\