लाखभर युवकांचा रोजगार हीरावण्याचे पातक नको

2

प्रमोद जठार यांचे खासदार विनायक राऊत यांना आवाहन

कणकवली, ता.२३ : नाणार येथील रिफायनरी प्रकल्पातून 1 लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. हा रोजगार हिरावून घेण्याचे पातक खासदार विनायक राऊत यांनी करू नये असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज केले. रोजगार संधी निर्माण करण्यासाठीच सिधुदुर्गातील जनतेने शिवसेनेच्या दोन आमदार आणि एका खासदाराला निवडून दिले. या मंडळींना रोजगार आणता येत नसेल तर येत असलेला रोजगार हिरावून घेण्याचा अधिकार नाही. दरम्यान नाणारसह 14 गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी विकत घेऊन त्या धनदांडग्यांना विकणारी मंडळी ही खासदार विनायक राऊत यांच्या शिवसेना पक्षातीलच पदाधिकारी मंडळी आहेत असा आरोपही भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला.

खासदार विनायक राऊत यांनी नाणारच्या मुद्दयावर केलेल्या टीकेला श्री.जठार यांनी आज कणकवलीत उत्तर दिले. ते म्हणाले, ते म्हणाले, स्थानिकांचा पाठिंबा असेल तर नाणारला आमचा विरोध नाही अशी भूमिका शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. स्थानिकांनीही रिफायनरीला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र खासदार विनायक राऊत नेमकी उलटी भूमिका घेऊन पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करीत आहेत. सिंधुदुर्गात जनतेने शिवसेनेला दोन आमदार दिले. एक खासदार दिला. पालकमंत्रीही शिवसेनेचेच आहेत. तरीही जिल्ह्यात रोजगार येत नाही ही शोकांतिका आहे.
नाणार प्रकल्पासाठी 13 हजार एकर जागा लागणार आहे. यातील 8 हजार एकर जमिनीवरील शेतकर्‍यांनी जागा देण्याचे मान्य केले आहे. तर या प्रकल्पातून र्प्रदुषण होणार नसल्याची ग्वाही केंद्र सरकार देत आहे. त्यामुळे विरोधाचे सर्व मुद्दे संपले असून खासदार या प्रकल्पाला विरोधासाठी विरोध करत आहेत. त्यांना सीवर्ल्ड नको, नाणार नको तर बेरोजगारांना रोजगार कसा देणार हे खासदारांनी जाहीर करावे असेही श्री.जठार म्हणाले.

3

4