‘सेल्फी विथ गणपती बाप्पा’ स्पर्धेचा निकाल जाहीर…

165
2
Google search engine
Google search engine
Google search engine

‘सेल्फी विथ गणपती बाप्पा’ स्पर्धेचा निकाल जाहीर…

मालवण, ता. २३ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांनी तरुणाईचं सेल्फीप्रेम लक्षात घेऊन गणेशोत्सवात कुडाळ मालवण मतदारसंघात एक आगळा वेगळा ‘सेल्फी विथ गणपती बाप्पा’* स्पर्धेचा उपक्रम राबविला होता. या स्पर्धेला कुडाळ मालवणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा निकाल १९ सप्टेंबर २०१९ रोजी जाहीर झाला आहे.
या स्पर्धेतुन २१ विजेते क्रमांक निवडण्यात आले आहेत. त्यांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मालवण तालुक्यातील विजेत्या स्पर्धकांनी आपली बक्षिसे मालवण शिवसेना शाखा येथे किरण वाळके- ९४२१२३६४८९, व कुडाळ तालुक्यातील विजेत्या स्पर्धकांनी कुडाळ शिवसेना शाखा येथे धीरज (गोट्या) चव्हाण- ९५१८९४३८४७ यांच्याशी संपर्क साधून घ्यावीत असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
‘सेल्फी विथ गणपती बाप्पा’ स्पर्धेतील २१ विजेते स्पर्धक असे- पायल प्रफुल्ल तांबट (कट्टा बाजारपेठ), भाग्यश्री जनार्दन मांजरेकर (भरड), प्रकाश सावंत (नाबारवाडी कुडाळ), ओंकार अजय सावंत (पिंगुळी शेटकरवाडी), धनश्री दिनेश माळवदे (नांदोस), भानुदास भगवान केरकर ( तारकर्ली), सोनिया रत्नाकर सुकी ( कुडाळ ), तृप्ती संतोष गावडे (चौके थळकरवाडी), धर्मेश पाडवे (सिंधुदुर्ग किल्ला मालवण), अंकिता सुजन शिरोडकर (ओरोस), शुभम अविनाश नाईक (घोटगे), शंकर अविनाश दाभोलकर (MIDC,कुडाळ), श्रीपाद कामत (पणदूर साईलवाडी), ऋषिकेश कृष्णा सावंत (असरोंडी दाडसखलवाडी), किशोर बापू कांबळी (चिंदर भटवाडी), नाना सुधाकर माळवे (अणाव दाभाचीवाडी), सचिन संजय सावंत (पिंगुळी शेटकरवाडी), प्रसाद तुलसीदास आडकर (सर्जेकोट,मिर्याबांदा), प्रियांका अंकुश चव्हाण (वायरी), संदीप राऊळ(नेरुर चव्हाटा), विश्वनाथ काळसेकर (झाराप)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ही आगळी वेगळी स्पर्धा घेण्यात आली असून स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी सर्व स्पर्धकांचे आभार मानले आहेत.

\