वेंगुर्ले.ता.२३: मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेण्यात आलेल्या युवा महोत्सवात वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या सुरज अविनाश राणे या विद्यार्थ्यांने रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तर आशिष पालकर या विद्यार्थ्याला पोस्टर मेकिंग स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्यांचे महाविद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले.
मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या युवा महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयातुन सुरज अविनाश राणे याला रांगोळीत प्रथम क्रमांक तर आशिष पालकर याला पोस्टर मेकिंग स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. त्याची निवड मुंबई येथील स्पर्धेसाठी झाली होती. मुंबई येथे झालेल्या युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धेत सुरज अविनाश राणे याने प्रथम क्रमांक मिळवला आशिष पालकर याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी डॉ. मंजिरी मोरे- देसाई तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. प्रदीप होडावडेकर, प्रा. डॉ. आनंद बांदेकर, प्रा. वामन गावडे, प्रा. डॉ. मनीषा मुजुमदार, सुरेंद्र चव्हाण, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.