सिंधुदुर्गातील तीनही जागा मनसे लढणार

2

परशुराम उपरकर यांची माहिती: उद्या कुडाळ येथे पदाधिकार्‍यांची बैठक

कणकवली, ता.२३: सिंधुदुर्गातील विधानसभेच्या तीनही जागा मनसे पक्ष लढविणार आहे. त्याअनुषंगाने उद्या (ता.24) कुडाळ येथील वासूदेव ट्रेड सेंटर येथे मनसेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक होत आहे. या बैठकीत मतदारसंघ निहाय उमेदवारांचीही चाचपणी होईल. तसेच भाजप सरकार विरोधात जनजागृती करण्याबाबतचे नियोजन देखील होणार आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी याबाबतची माहिती आज दिली.
श्री.उपरकर यांनी येथील मनसे संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राज्यातील सर्व मतदारसंघात निवडणूक लढविण्याचे मनसेने निश्‍चित केले आहे. तर सिंधुदुर्गातील तीनही जागा लढविण्यासाठी मनसेतील अनेक पदाधिकारी इच्छुक आहेत. यातील काही सिंधुदुर्गातील तर काही मुंबईतील पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. उद्या (ता.24) कुडाळ येथील बैठकीत मनसेच्या इच्छुक उमेदवारांबाबत कार्यकर्त्यांकडून मते आजमावली जाणार आहे. तसेच पुढील काळात खड्डेमय रस्ते, मच्छीमारांचा प्रश्‍न, महागाई या प्रश्‍नांवर सरकारचे अपयश आम्ही जनतेला दाखवून देणार असल्याचेही श्री.उपरकर म्हणाले.

2

4