मालवणी कवी दादा मडकईकरांचा २९ ला सावंतवाडीत सत्कार…

2

जयेंद्र परूळेकर:सत्तरी गाठल्याने सिंधुरत्न फाउंडेशनचे आयोजन…

सावंतवाडी,ता.२३:
मालवणी मुलखाला आपल्या वेगळ्या ढंगात, मालवणी भाषा व कविता मधून अनेकांपर्यंत पोहोचवणारे सावंतवाडीतील कवी दादा मडकईकर हे सत्तरी पार करत आहेत. त्यानिमित्ताने येथील सिंधुरत्न फाउंडेशनच्या माध्यमातून रविवार दिनांक २९ रोजी सायंकाळी सहा वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती फाउंडेशनचे पदाधिकारी डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी आज येथे दिली.
श्री.मडकईकर हे २८ तारखेला सत्तरी पार करत आहे.गेली अनेक दशके त्यांनी मालवणी भाषेवर प्रभुत्व निर्माण करून कवितांच्या माध्यमातून मालवणी मुलूख येथील जत्रा, पाऊस, निसर्ग, मालवणी भाषा आणि मालवणी माणूस लोकांपर्यंत मांडला त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल हा त्यांचा सन्मान आहे. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते त्यांचा कौतुक सोहळा होणार आहे.

0

4