कणकवली पत्रकार संघाच्यावतीने तहसिलदारांचा सत्कार…

2

कणकवली ता.२३: तालुका पत्रकार संघाच्यावतीने नवनिर्वाचित कणकवली तहसिलदार आऱ.जे.पवार यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष भगवान लोके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़.तर कणकवली उपविभागीय अधिकारी पदावर वैशाली राजमाने यांची नेमणूक झाल्याबद्दल अध्यक्ष भगवान लोके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले़.कणकवली तालुक्यात तलाठी पदापासून श्री.पवार यांनी नागरीकांना सुविधा दिली़.त्यानंतर मंडल अधिकारी, नायब तहसिलदार,कणकवली उपविभागीय कार्यालयात शिरस्तेदार अशा विविध पदांवर राहून नागरीकांना चांगले सुविधा देण्याची भूमिका श्री.पवार यांनी बजावली होती़.
गेल्या अनेक वर्षांच्या सेवेत आऱ जे़ पवार यांचा असलेला प्रामाणिकपणा आणि जनतेच्या कामाबद्दल असलेली तळमळ लक्षात घेऊन पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा तहसिलदार आऱ जे़ पवार यांचा सत्कार करण्यात आला़
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुधीर राणे, माजी तालुकाध्यक्ष संतोष राऊळ, चंद्रशेखर देसाई, स्वप्निल वरवडेकर, संजय राणे, संजय पेटकर आदींसह पत्रकार उपस्थित होते़.

9

4