नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू…

2

गवंडीवाडा येथील घटना…

मालवण, ता. २३ : नारळाच्या झाडावरून पाय घसरून पडल्याने फ्रान्सीस ऊर्फ बाबूश कैतान इस्तूबूर (वय-५९) रा. गवंडीवाडा यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
गवंडीवाडा येथील फ्रान्सीस इस्तूबूर हे गेली अनेक वर्षे नारळ काढण्याचे काम करत होते. आज दुपारी ते गवंडीवाडा येथील गिरप यांच्या मालकीच्या नारळाच्या झाडावर नारळ काढण्यास चढले होते. यात अचानक पाय घसरल्याने ते खाली कोसळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष राजू वराडकर यांच्यासह अन्य नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. अधिक तपास विलास टेंबुलकर हे करत आहेत.

34

4