रस्त्यातल्या खड्ड्यात अडकली चक्क कार….

2

बांदा येथील प्रकार:स्थानिकांकडुन बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार नाराजी

बांदा ता
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात चक्क गाडीत अडकल्याचा प्रकार आज बांदा येथे घडला.
या प्रकारामुळे शहरातील ग्रामस्थांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली.
ही घटना आज सायंकाळी बांदा आंबोलीत मार्गावर कट्टा काॅर्नर परिसरात घडली. दरम्यान अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच अक्रम खान जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर यांनी याठिकाणी धाव घेत तात्काळ उपायोजना राबविण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत

0

4