तेलंगणा-राज्य “किक बॉक्सिंग” स्पर्धेत बांद्याच्या निकिता,तेजस,भीमसेनचे यश…

2

ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार; १ सुवर्ण तर २ कांस्य पदकांचे मानकरी…

बांदा ता.२४: तेलंगणा येथे राज्य किक बॉक्सिंग स्पर्धेत येथील सुवर्णपदक मिळविलेल्या निकिता गावडे व कांस्यपदक मिळविलेल्या तेजस परब व भीमसेन दळवी यांचा बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यांनी हे सुयश प्राप्त करून बांदा गावचे नाव रोशन केले आहे.असा विश्वास यावेळी बोलताना सरपंच अक्रम खान यांनी व्यक्त केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर,हर्षद कामत,राजेश विरनोडकर,शाम मांजरेकर,किशोरी बांदेकर,रिया अल्मेडा,उमंगी मयेकर आदी तसेच प्रशालेतील शिक्षक उपस्थित होते.

18

4