वैभववाडी करुळ राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
वैभववाडी/पंकज मोरे.ता,२४: वैभववाडी-करूळ राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी ‘खड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे’ अशी रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. खड्डे इतके मोठे आहेत की, याठिकाणी अपघात होण्याची दाट संभवना आहे. या मार्गावरुन वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी लवकरच खड्डे बुजविण्यात यावेत. अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांमधून केली जात आहे.
तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरून २४ तास वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. येथून अवजड वाहतूक करणा-या वाहनांची संख्या देखील मोठी आहे. गतवर्षी या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते. वैभववाडी करुळ दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. याठिकाणी अपघात होण्याची दाट संभवना आहे.एडगाव ते करुळ रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने खड्डे पडले आहेत. तारेवरची कसरत करत वाहनचालकांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे प्रवाशांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.