बांगीवाड्यातील नागरिकांनी केले यतीन खोत यांचे भव्य स्वागत…

2

मालवण, ता. २४ : स्वाभिमानची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केलेल्या युवा नगरसेवक यतीन खोत यांचा बांगीवाडा येथील यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने पुष्पहार घालत शुभेच्छा देण्यात आल्या.

मालवण पालिकेतील चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. काल येथे दाखल झालेल्या या चारही नगरसेवकांचे शहरात जल्लोषी स्वागत करण्यात आले. यात बांगीवाडा येथेही स्थानिक नागरिक व यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने नगरसेवक यतीन खोत यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. खोत यांनी आपल्या प्रभागातील विविध विकासकामे मार्गी लावल्याने स्थानिकांच्या मनात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. यापुढील काळातही त्यांच्याकडून प्रलंबित विकासकामे निश्चितच मार्गी लागतील असा विश्वास स्थानिक नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.

1

4