मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भूमिपूजनात पंचायत समिती पदाधिका-यांना डावलले

2

विरोधी सदस्यांचा आरोप:या मागे नेमका शकुनीमामा कोण,शोध घेण्याची मागणी

सावंतवाडी ता
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भूमिपूजन समारंभाच्या ठिकाणी पंचायत समितीच्या सभापतीसह सदस्यांना आमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकारामागे नेमका शकुनीमामा कोण याचा शोध घ्या अशी मागणी पंचायत समिती सदस्या सौ मनिषा गोवेकर यांच्यासह विरोधी गटाच्या सदस्यांनी केली.याला विरोधी गटाच्या सदस्यांनी पाठींबा दिला.या प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जबाबदार असून त्यांना जाब विचारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी निधी वाटप करताना समान निधीचे वाटप केले नाही अशी नाराजी विरोधी गटाच्या सदस्यांनी केली. सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा आज येथे पार पडली यावेळी सभेच्या सुरुवातीला बांधकामच्या अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यात आले एवढे मोठे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सावंतवाडीत उभे राहत आहे ही कौतुकाची बाब आहे मात्र त्या हॉस्पिटलच्या पायाभरणी समारंभ पंचायत समिती सभापती व पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले नाही याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली तर यामागे नेमका शकुनीमामा कोण याचा शोध घ्या तसेच या साठी दोषी असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम अधिकार्‍यांना जाब विचारा अशी मागणी सौ गोवेकर यांनी केली

10

4