केसरकरांच्या मंत्रिपदाचा फायदा काहींना घेता आला नाही…

2

राजन पोकळे : निधी मिळून सुद्धा शहर विकासात मागे राहिल्याची खंत…

सावंतवाडी,ता.२३:
दीपक केसरकर हे मंत्री असताना त्यांच्या मंत्रीपदाचा योग्य तो फायदा येथील पालिका पदाधिकाऱ्यांना घेता आला नाही.त्यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशी अप्रत्यक्ष टिका माजी उपनगराध्यक्ष तथा पालकमंत्री केसरकर यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे राजन पोकळे यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे नाव न घेता केली.
दरम्यान यापुढे आपण कोणतीही राजकीय,संस्थेची,समाजाची अशी कोणतीही निवडणूक लढवणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.पोकळे यांनी आज पत्रकाराची संवाद साधला यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर,आनारोजीन लोबो उपस्थित होते.
ते म्हणाले दीपक केसरकर नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणावरून काम करून गेली त्यांनी आपल्या काळात मोठ्या प्रमाणात शहराचा विकास केला अनेक मात्र त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात त्यांच्या मंत्रिपदाचा मनाला तसा फायदा करून घेता आलेला नाही. करोडो रुपयाचा निधी मिळून सुद्धा शहर विकासात मागे राहिले आहे. याठिकाणी राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न नाही. परंतु केसरकर यांच्या मदतीने शहरात निर्माण झालेल्या अनेक प्रश्न मार्ग काढणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही अंडरग्राउंड वीज वाहीन्या सारखी मोठी स्कीम रखडली आहे. त्यामुळे तब्बल दहा कोटी रुपये पुन्हा जाण्याची भीती आहे. केवळ ऑफिस टाईम मध्ये काम केले म्हणून विकास झाला असे साधता येणार नाही, तर पालकमंत्री दीपक केसरकर नगराध्यक्ष असताना त्यानी रात्री तीन वाजेपर्यंत पालिकेत राहून काम केले त्यामुळे ते राज्यात सावंतवाडीला नाव मिळवून देवू शकले. असेही पोकळे म्हणाले.

2

4