रक्तदाब वाढलेल्या माजी सैनिकाला रस्त्यावरच घातले उतरून…

104
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुनंदा राऊळ यांचा पंचायत समिती बैठकीत रुग्णवाहिका चालकासह डॉक्टरांवर आरोप…

सावंतवाडी ता.२४: आंबोलीत कार्यरत असलेल्या रूग्गवाहीकेच्या चालकाने तब्बल साठ वर्षाच्या माजी सैनिक वृध्दाला रक्तदाब वाढलेला असताना रस्त्यावरून चालत सावंतवाडी कुटीर रुग्णालयात पाठवले.तसेच आम्हाला चतुर्थी आहे,असे सांगून त्या रुग्णवाहिकेत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्णाला अर्ध्यावरच सोडून,त्या एसटी स्टँडवर उतरल्या.हा प्रकार योग्य नाही.त्या प्रकाराबाबत दोघांची चौकशी करा,अशी मागणी पंचायत समिती सदस्य सौ.सुनंदा राऊळ यांनी आज येथे आयोजित बैठकीत केली.
यावेळी संबंधित रूग्णवाहीकेच्या चालकाला त्याठिकाणी बैठकीत बोलावण्यात आले.मात्र आपण तसा कोणताही प्रकार केला नाही,उलट खिशातला रुमाल त्या वृद्धाला उलटी पुसण्यासाठी दिला.असे सांगुन त्या चालकाला रडूच कोसळले.आपल्यावर झालेला आरोप चुकीचा असल्याचे त्या चालकाचे म्हणणे आहे.मात्र घडलेली घटना योग्य नाही,त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करा व संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी विरोधी भाजपाचे सदस्य संदीप गावडे यांनी केली.
पंचायत समितीची मासिक सभा आज या ठिकाणी झाली.यावेळी सभेत एका माजी सैनिक वृद्धाला आरोग्य खात्याकडून देण्यात आलेल्या या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.तसेच याबाबत अहवाल सात दिवसात सादर करा,असे आदेश तालुका आरोग्य अधिकारी पी.एन.तळेगावकर यांना सभापती पंकज पेडणेकर व उपसभापती संदीप नेमळेकर यांनी दिले.

\