मडूरे नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी प्रविण परब

2

बांदा.ता,२४:मडूरे येथील श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी प्रविण परब तर उपाध्यक्षपदी नारायण मोरजकर यांची बिनविरोध निवड झाली. संतोष जगन्नाथ परब यांची सचिवपदी फेरनिवड झाली. नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावरही बैठकीत चर्चा झाली.
मडूरे माऊली मंदिर सभागृहात नवरात्रोत्सव मंडळाची सभा आयोजित करण्यात आली होती. मंडळाची नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – प्रविण परब (अध्यक्ष), नारायण मोरजकर (उपाध्यक्ष), संतोष परब (सचिव), सदस्य सोमनाथ परब, कृष्णा गावडे, अरूण परब, रामा परब, प्रवीण गोविंद परब, दिलीप परब, विजय परब, संतोष परब, जगन्नाथ परब, सुहास परब, संदिप परब, सुरेश परब, नितीन नाईक, दशरथ केरकर, शशिकांत परब, नकुळ परब, दत्ताराम परब, रामचंद्र सावळ, आनंद नाईक, तुषार धुरी व प्रकाश जाधव. यावेळी कार्यक्रमांच्या नियोजनावरही चर्चा झाली. स्वातंत्र्य सैनिक नारायण परब व मडूरा सोसायटी व्हाईस चेअरमन जगन्नाथ परब यांनी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक व आभार सचिव संतोष परब यांनी मानले.
फोटो:-
प्रविण परब

6

4