तंदुरुस्तीसाठी आहाराच्या पंचसूत्रीचे पालन करा

2

श्रृती हिर्लेकर : वेंगुर्लेत पोषक आहार व युवा पिढी‘ कार्यक्रम संपन्न

वेंगुर्ले, ता.२४ : मानसिक, शारिरीक तसेच भावनिक आरोग्य जपणे आवश्यक आहे. हे आपण जर साध्य केले तर कोणत्याही कामात आपण यशस्वी होऊ शकतो. भारतात पोषणाचे महत्व अजून समजलेले नाही हे दुर्देव आहे. जीवनातील पहिले हजार दिवस रक्तक्षयावर मात, व्यक्तिगत स्वच्छता, घरघर पोषण व्यवहार ही आहाराची पंचसूत्रे असून त्यांचे पालन केल्यास आपण तंदुरुस्त राहू शकतो असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ डॉ.श्रृती हिर्लेकर यांनी ‘पोषक आहार व युवा पिढी‘ या विषयावर बोलताना केले.
बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘पोषण महिना २०१९‘ या कार्यक्रमांतर्गत आहारतज्ज्ञ डॉ. श्रृती हिर्लेकर यांचे  ‘पोषक आहार व युवा पिढी‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, वनस्पती विभाग प्रमुख डॉ.धनश्री पाटील, इंग्रजी विभागा प्रमुख डॉ. मनिषा मुजुमदार उपस्थित होते. कु. करिश्मा मोहिते ‘जेनरिकल मॉडिफाईड फूड‘ यावर करिश्मा मोहिते हिने आपले विचार मांडले. यावेळी ‘हेल्दी टिफीन‘ स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले. यात विजेत्या गौरव गावडे (प्रथम), अनुष्का सडवेलकर (द्वितीय), संतोषी आमडोसकर (तृतीय) यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली गावडे हिने तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.पी.नंदगिरीकर यांनी मानले.

17

4