मुंबई शुटिंगबॉल असो. सरचिटणीसपदी दीपक सावंत यांची फेरनिवड…

2

मालवण, ता. २४ : मुंबई शूटिंगबॉल असोसिएशनच्या सरचिटणीसपदी मसुरे गावचे सुपुत्र व ठाणे- मुंबई येथील उद्योजक दीपक सावंत यांची फेरनिवड झाली आहे. असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड झाली.

यात अध्यक्षपदी माजी आमदार शाम सावंत, उपाध्यक्ष भास्कर कावले, मंगेश भोसले, प्रदीप वाघ, राजा राजापुरकर, कार्याध्यक्ष विजय रावराणे, सहचिटणीस जालंधर चकोर, मिलिंद बिर्जे, खजिनदार प्रफुल्लकांत वाईरकर, सहखजिनदार राजा कुडतरकर, सदस्य- रत्नदीप रावराणे, ध्रुवकुमार वाईरकर, विद्याधर जामसंडेकर, पांडुरंग सुतार, श्रीकांत वाईरकर, बलविंदर फ्लोरा, राजेश चव्हाण, सहदेव कावले, दिलीप मालंडकर यांची निवड करण्यात आली. मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन ही संस्था शूटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेला संलग्न असून शूटिंगबॉल या क्रीडा प्रकारात मुंबईला राज्याचा दर्जा मिळाला आहे.
यावर्षी मुंबईत राष्ट्रीय स्तर अखिल भारतीय स्पर्धा आयोजित करण्याचा मानस सरचिटणीस व नूतन कार्यकारिणीने व्यक्त केला. शूटिंगबॉल हा राज्य सरकार मान्य क्रीडा प्रकार असून शालेय परीक्षेत क्रीडा गुण, छत्रपती पुरस्कार यात समाविष्ट आहे. क्रीडा क्षेत्रासह, सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात विविध संस्थांमध्ये काम करणार्‍या दीपक सावंत यांच्या निवडीबद्दल मसुरे गावातून अभिनंदन होत आहे.

1

4