किक बॉक्सिंंग व कराटेमध्ये वेंगुर्लेतील हळदणकर बॅचचे यश

106
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले, ता.२४ : सिंंधुदुर्ग जिल्हा क्रिडा कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद यांच्यावतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंंग व कराटे स्पर्धेत वेंगुर्ला येथील ‘हळदणकर बॅचच्या‘ मुलांनी घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये १४ व १७ वर्षाखालील वयोगटामध्ये  ऋतुजा कुबल, निर्जला पाटील, प्रतिक्षा आरोलकर, हर्ष नाईक, चिन्मय नाईक, भुवन तेंडोलकर (सर्व प्रथम), द्वितीय – शलाका दळवी, अल्फिया शेख, संजना जंगले, आर्या जंगले, नेहा तांडेल, साक्षी शेट्टी, भार्गव तांडेल, वेदांत सातार्डेकर (सर्व द्वितीय), ईशान चव्हाण (तृतीय) यांचा समावेश आहे.
स्पर्धेत प्रथम आलेल्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक पुंडलिक हळदणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

\