पियाळी येथे कृषी माहिती केंद्राचा लोकार्पण सोहळा

2

सिंधुदुर्गनगरी,ता.२४:
कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथील कृषिदूतांकडून पियाळी येथे कृषी माहिती केंद्र उभारले आहे.पियाळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात हे माहिती केंद्राची स्थापना केली असून याद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक शेती विषयी माहिती मिळणार आहे. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना गांडूळ खत निर्मिती, शेततळे व जीवामृत या बद्दल माहिती दिली. यावेळी भारतीय निवडणूक आयोगाचे कणकवली तालुका प्रमुख श्रीमती विद्या जाधव, श्री सुदर्शन अलकुटे, पोलीस सहाय्यक श्री रघुनाथ जांभळे, सरपंच श्रीमती पवित्रा गुरव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन कृषीदूत विक्रम पवार, संदीप राऊत, प्रदीप रोपळे, संग्राम साळोखे, सादिक शेख, रिझवान शेख यांनी करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

फोटो ओळी /-
पियाळी येथे कृषीदुतांनी कृषी माहीती केंद्रांची स्थापना केली. यावेळी अधिकारी, सरपंच व शेतकरी उपस्थित होते.

29

4